Tuesday, January 3, 2012

जेथे जातो तेथे

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती  धरुनिया


चलो वाटे आम्हा तुझाची आधार ...
चालविसी भार सवे माझा ..


बोलो जाता बरळ  कारीतसी ते नीट
नेली लाज धीट केलो देवा


तुका म्हणे आता खेळतो कौतुके
जाले तुझे सुख अंतर्बाही . 




No comments: