Sunday, November 17, 2013

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा !


डी एस के यांच्या कृपेने आज "गीतरामायण" हा श्रीधर फडके यांचा कार्यक्रम अनुभवण्याचा योग आला ! हा उत्तुंग आविष्कार आणी त्याच बरोबर धनश्री लेले या विदुषी चं निरुपण ऐकून धन्य झाल्या सारखं वाटलं !

गदिमा ह्या महा-कविराजा चे पाय धरायला मला ह्या आयुष्यात मिळाले नाहीत याची चणचण लागून गेली !
फक्त ह्या एका गाण्यातल्या पहिल्या आठ अंतर्यात गदिमांनी जीवनाची सर्व "फिलोसॉफी" सांगून टाकली आहे !
ह्या गाण्या बद्दल चा अजून एक आश्चर्यकारक किस्सा म्हणजे .. बाबुजींनी (सुधीर फडके ) ह्या गाण्याला चाल हि रेडियो वर "लाइव" गाता-गाता .. सकाळी ८.४० ते ९ च्या दरम्यान लावली !

गदिमा आणी सुधीर फडके या जोडीला साष्टांग नमस्कार ! 

श्रीरंग भावे  च्या स्वरात पराधीन आहे जगती


खुद्द बाबूजींच्या स्वरात .. पराधीन


श्रीधर फडके यांच्या स्वरात - पराधीन 



----------------------

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा  !

----------------------


दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?

वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ

पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा  !






Monday, November 11, 2013

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती


' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ' ह्या अभंगा ला दोन चालीत गायलं गेलं आहे .
लोकप्रिय चाल हि श्रीनिवास खळे यांची , लता मंगेशकर यांनी गायलेली ! पण हाच अभंग , अजून एका वारकरी चालीत गायलेला मला खूप आवडतो ..





जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया


चालो वाटे आम्ही तुझाची आधार
चालविसी भार सवे माझा


बोलो जाता बरळ करीसी ते नीट
नेली लाज, धीट केलो देवा


तुका म्हणे आता खेळतो कौतूके
जाले तुझे सुख अंतर्बाही

------

दुसरी चाल .. मला अधिक आवडणारी ! .. ह्या लिंक वर mp3 aahe !


http://plasamusic.mobi/detail/1/dUQzZXBrSkc/jethe-jato-download-play-listen-songs.html




Sunday, November 10, 2013

आज फिर जीने की तमन्ना हैं !


कल के अंधेरों से निकल के, देखा हैं आँखे मलते मलते
फूल ही फूल जिन्दगी बहार हैं,
तय कर लिया
आज फिर जीने की तमन्ना हैं

काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल
कोई ना रोको दिल की उड़ान को,
दिल वो चला
आज फिर ...

डर हैं सफ़र में कही खो ना जाऊ मैं,
रास्ता नया

आज फिर जीने की तमन्ना हैं

शैलेंद्र


Saturday, November 9, 2013

निवडक हरितात्या



हरितात्या आम्हाला शिवाजी, तानाजी , समर्थ ,तुकाराम वैगरे मंडळींना हे असे भेटवून आणायचे ...
वर्गातला इतिहास मला कधी आवडला नाही आणि कळला हि नाही ...त्यात सन होती .. हरीतात्यांचा  इतिहास सणांच्या गणितात गुंतला नव्हता .. तो हरीतात्यान   इतकाच जिवंत होता...
हरीतात्यांनी इतिहास हा भूतकाल वाचक क्रीयापादानी दूर न्हेलेला नव्हता .. असं वाटायच कि नुकतेच भेटून आलेत छत्रपतींना.. आज लक्ष्यात येतं ... त्यांचा त्या गोष्टीतला मी म्हणजेच ती इतिहास नावाची अज्ञात व्यक्ती !
प्रत्येक  प्रसंगी हरितात्या त्या तिथे कसे हजर  होते हा विचार लहानपणी आमच्या डोक्यात कधी  शिरला नाही आणि मोठे पणी आम्ही त्यांना त्या जागृत समाधी तून कधी बाहेर काढलं नाही


माझं बालपण इतिहास जमा झालं ... घरातली करती माणसं हि दृष्ट लागून जावी तशी गेली ....आजोबा आज्जी गेली ... वडील गेले .. घरचे नात्या गोत्यातले लोकही आता परके झाले आहेत ... हरीतात्या कुठे गेले कोण चौकशी करतोय ..
पण कधी कधी पाठीलाही डोळे फुटतात आणि त्यात काचांच्या फुटक्या  तुकड्यात जशी खूप  प्रतिबिंब लक्षात यावीत  तशी जिव्हाळ्या ची दिवंगत   माणसे दिसायला लागतात .. जीव एवढा एवढासा होतो ...
एखादा उदबत्तीचा वास   एखाद्या नव्या कोर्या छत्री वर पाडलेल पाणी ... ..मनाला मागे घेऊन जातं .. हरीतात्यांचा आवाज घुमायला लागतो ..
या देवा घराच्या माणसांनी आम्हाला खूप दिलं .. सदैव इतिहासाचे पंख लावलेला हा वेडा बागडा माणूस आम्हा एवढ्या एवढ्या हलक्या पोरांना  घेवून उडत उडत  जायचा ... खर खोट  देव जाणे पण क्षत्रिय कुलावतौंस वैगरे च दर्शन  घडवायचा

आमच्या चिमुकल्या जीवनाच्या हरळी च्या मुळ्या त्यांनी भूतकाळात जाऊन रुजवल्या... हरीतात्यांनी  कधी आम्हाला पैशाचा खाऊ दिला नाही ... पण प्रचंड अभिमान दिला ..
चिमुकल्या मनगटात कसल्या तरी जोमाच्या मनगट्या घातल्या .. त्या वेळी दिसल्या नाहीत त्याच्या त्या अदृष्य वळ्या  पण आज  एखाद्या आघाताच्या क्षणी दिसतात . दुर्दैवानी दरवेळी  मुठी वळाव्यात तश्या वळतातच असे नाही ... पण वेळी प्रसंगी  वाळू शकतील असा कुठेतरी आत्मविश्वास जो आत मध्ये  लपलेला आहे तो हरीतात्यांनी आम्हाला  न मागता दिला......  


निवडक अंतू बरवा



रत्नागिरीच्या त्या मधल्या आळी मध्ये लोकोत्तर पुरुष राहतात.  देवानी एक ...माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्या मध्ये रत्नागिरीच्या लाल चिर्याचे , नारळा फणसाचे , खाजर्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणार्या ओल्या  सुपारीचे गुण अगदी एकवटून भरलेत . 

अंतू बरवा हा ह्याच मातीत उगवला आणि पिकला.

जीवनाच्या कुठल्या तत्व ज्ञानाच्या अर्क हि मंडळी प्यायली आहेत .. देव  जाणे .. त्यातली निम्म्या हून अधिक माणसं मनी ओर्डर वर जगतात .. आणि त्यातले पैसे  वाचवून दावे लावतात..प्रत्येकाची तारीख पडलेली ..


विशाल सागर तीर आहे .. नारळीची बन आहेत  पोफळी च्या बागा आहेत ... सार काही आहे .... पण ...त्या  उदात्ततेला दारिद्र्य असं छेद देवून जांत आणि मग उरत काय ?   एक भयाण  विनोदाच  अभेद्य असं कवच !


कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील --- खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात !






निवडक रावसाहेब



एखाद्या माणसाची आणि आपली वेव्लेन्ग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये .. ह्याला काही उत्तर नाही. पंधरा- पंधरा वीस- वीस वर्षाच्या परिचयाची माणसं असतात .. पण शिष्टाचाराची घडी थोडीशी  मोडण्या    पलीकडे  त्यांचा आणि आपला कधी संबंधच जात नाही .. त्यांच्या घरी जाणं होतं , भेटणं बोलणं होतं , पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत.
आणि काही माणसं ... आगदी क्षणभरात जन्म जन्मांतरीच नातं  असल्या सारखा दुवाद साधून जातात... वागण्यातला बेत शुद्ध पणा अगदी क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही , पूर्व संस्कार , भाषा , चवी, आवडी निवडी .. कशाचाही आधार लागत नाही ... सुत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात !

बेळगावच्या कृष्णराव  हरिहरांची अशीच गाठ पडली .. त्यांना सर्व लोक रावसाहेब म्हणायचे ... 
हि रावसाहेबी त्याना सरकार नी बहाल केली नव्हती .. जन्माला येतानाच ते  ती घेवून आले होते .. शेवट पर्यंत ती सुटली नाही !     
काही माणसांची वागण्याची तर्हाच अशी असते कि त्यांच्या हाती मद्याचा पेला देखील फुलतो आणि काही माणसं दुध देखील ताडी प्यायल्या सारखे पितात ..
रावसाहेब शौकीन होते पण वखवखलेले नव्हते ..जीवानात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले .... पण उपाशी वाघ हा  काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्या च्या वळणावर न्हेईल ?