Saturday, July 25, 2020

मराठी चित्रपट - माझी Top Ten लिस्ट

 


चांगले, दर्जेदार मराठी चित्रपट पाहायचेत ?
माझी Top Ten लिस्ट :

१) देऊळ  : Mark Twain स्टाईल चा विनोद आणि sarcasm (उपरोध )

२) विहीर  : Nostalgic .. मी ह्या सिनेमाला "classic" दर्जा देईन
 

३) वळू : मराठीतल्या "मालगुडी" चा भास करून देणारी , पण original कलाकृती
 

४) हायवे : उच्च दर्जाची, जागतिक दर्जा ची कलाकृती .. कुलकर्णी द्वयी ची कमाल कलाकृती 

वरील चार ही सिनेमे अतिशय उत्तम आणि उच्च दर्जा चे आहेत .. गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी च्या प्रतिभे चे दर्शन घडवतात.. "हायवे" नंतर सतत रेंगाळत राहिलेली भा रा ताम्बेंची कविता :

"घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्‍न मना, बघ जरा तरी !
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं
का गुदमरशी आतच कुढुनी ?"




५) जिंदगी विराट : भाऊ कदम  आणि भूतकर नी कमाल केली आहे !

६) भोभो :
प्रशांत दामले एका वेगळ्या रोल मध्ये .. मनाला स्पर्श करून जाणारा 
 

७) ताऱ्यांच बेट : सचिन खेडेकर आणि लहान मुलानी कमाल ऍक्टिंग केली आहे .. कोकणातल्या सामान्य,सात्विक माणसाचं  चित्र .. Pure Innocence 

८) फँड्री : नागराज  मंजुळे चा आवडलेला चित्रपट .. किशोर कदम ची ऍक्टिंग .. कमाल !
 

९) मुळशी पॅट‍‌‌र्न  : भयानक वास्तविकता , पहावीशी वाटणारी "हिंसा"... आणि प्रवीण तरडे , भूतकर
 

१०) बोकड : ३० गाणी असलेला , संगीत नाटका सारखा गाण्यातून पुढे जाणारा सिनेमा

"पणन,पणन म्हणजे काय?
खाली डोके वरती पाय!
विक स्वतः ला विक मनाला
होऊदे रूटीन!"

"दिसतंय तसं नसतंय .. म्हनून जग फसतंय !"


११ ) सिंहासन : माझा मराठीतील सर्वात आवडता सिनेमा , अनेक वेळा पाहिला आहे .. अनेक वेळा पहावा असाच .. क्लासिक !

(जाता- जाता .... बघण्यात वेळ घालवू नये असे सरकारी निधी घेऊन बनवलेले दोन टुकार चित्रपट )
१) फर्जंद
२) उबुंटु

Saturday, June 27, 2020

जून चा महिमा .. नक्षत्रांचे देणे



जून महिना हा माझा आवडता महिना आहे.  त्याचं मुख्य कारण म्हणजे … फणस पिकायला खरी सुरवात होते ती जून महिन्यात येणार्या ज्येष्ठ मासात !  अजून एक कारण म्हणजे कोकणात “अंतू शेठ” बरोबर होणारी  वार्षिक भेट आणि होणार्या चर्चा … आप्तेष्ठांचे वार्षिक स्नेह संम्मेलन … नानू , नाथा , गजा , बबडू , परांजप्या, गोखले आणि हमखास भेटणारे चितळे मास्तर !



जून महिना मला तसा वर्षातला सर्वात महत्वाचा महिना हि वाटतो.. कारण वर्षा च्या मध्यावर , पूर्वार्धा कडे  मागे वळून हि पहाता येतं आणि उत्तरार्धा ची आखणी हि करता येते !

मराठी साहित्या च्या दृष्टी नी मात्र जून महिन्याला  एक कारुण्य आणि उदासीनते ची किनार आहे .. त्याचं कारण हि तसंच आहे.. अनेक  प्रसिद्ध मराठी साहित्यिकानी ह्या जून महिन्यातच जगाचा निरोप घेतला … अभिजात मराठी साहित्य आणि संगीतातील अनेक  नामवंतांची पुण्यतिथी ह्या जून महिन्यातंच !

जून १ १९३४ – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , नाटककार आणि विनोदी लेखक
.
जून १ १९९८ – गो.नी. दांडेकर , मराठी कादंबरीकार

जून ४  १९१८ – गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक

जून ५  १९८७ – ग. ह. खरे , भारतीय इतिहासतज्ञ.

जून ६  २००२ – शांता शेळके , मराठी कवियत्री.

जून ७  १९९२ – डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक

जून ११ १९५० – पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, स्वातंत्र्य सैनिक

जून १२, २००० – पु. ल. देशपांडे , मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार.

जून १३  १९६९ – प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक , पत्रकार, संपादक, राजकारणी, शिक्षणतज्ञ, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक व प्रभावी वक्ते.

जून १७  १८९५ – गोपाळ गणेश आगरकर , समाजसुधारक, विचारवंत.

जून २०  १९९७ – वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर

जून २६  २००१ – वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक  ( व पु )

अखेर जून महिन्यात संगित नाटक क्षेत्रातील एका उत्तुंग तारया ची जयंती हि आहे

 जून २६  .. बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस !


अभिजात मराठी साहित्याला एक अभूतपूर्व लोकप्रियता मिळवून देणार्या .. व पु , प्र के अत्रे , गदिमा आणि पु ल ह्या साहित्यिकांनी मला मराठी साहित्या ची गोडी लावली  ..  १२ जून हि पुलं ची पुण्यतिथी , म्हणून हि ब्लॉग पोस्ट आज टाकावीशी वाटली !
पुलं आणी पिलू .. अरे वेड्या मना तळमळसी .. 


जन्म आणि मृत्यू ह्या विषया वर चार ओळी...फसवणूक आणि हसवणूक
 “जन्म आणि मृत्यु ह्या दोन टोकांच्या मधे पकडून नियतीने चालवलेली आपणा सा‍र्‍यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्‍या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं? ”

– पु.ल  (प्रस्तावना : हसवणूक)



जन्म आणि मृत्यू ह्या विषया वर चार ओळी,  ज्या एक अमर गीत म्हणून आपल्याला माहित आहे ...आरती प्रभू, भास्कर चंदावरकर आणि रवींद्र साठे, यांनी या गीता ला अमरत्व दिलं आहे .. माझं  सर्वात आवडतं गाणं  ...

अंत झाला अस्ताआधी,
जन्म एक व्याधी, 
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी, त्याचा पडे बळी आधी,
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !



युट्यूब वर "कुणाच्या खांद्यावर" ची माझी प्लेलीस्ट 

खानोलकरां वर एकउत्कृष्ट वाचनीय लेख ( माधवी वैद्य )

कुणाच्या खाद्यावर ( गीता वरची माझी एक जुनी ब्लॉग पोस्ट ) 

Thursday, June 25, 2020

भारुड : शेण-आ-पती ची कथा



संत एकनाथांना आणि त्यांच्या प्रसिद्ध भारुडा ला स्मरून, गेल्या ६ महिन्यातील  महाराष्ट्रा च्या दयनीय स्थिती वर एक भारुड लिहिण्याचा प्रयत्न केला आहे ... चूक- भूल द्यावी घ्यावी

चाल ,स्वर्गीय राम कदम यांच्या स्मुतीस अर्पण ..त्याना  साष्टांग नमस्कार ..

चाल :  आली आली हो  भागा बाई ..आली आली हो  भागा बाई ..
भारुड : शेण - आ - पती ची कथा

शेणी कांच्या ह्या शेण-आ-पती ची काय सांगावी कथा 
फावड्या ला ह्या कोणी कोमटया म्हणतात 
कोणी जळक्या म्हणतात..
ह्या गद्दाराला कोणी लाचार हि म्हणतात
कोणी शेंबड्या - महापप्पू तर
कोणी बुजगावणं सु..द्धा म्हण ..तात

आली आली हो  भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..

मुंबई ची वाट लावून झाल्यावरी , निघाली शेणा महाराष्ट्राच्या पथ्यावरी 
बापाच्या पुण्याई वर , नरु-देवू च्या नावावर , मिळवली मतं गावभर 
लबाड लांडगा, हग्रलेखक हा, होता बांधलेला सिल्वर ओक च्या आत,
केला त्याने "खरया मालकाचा" घात
आणि आणिली ह्या "सम -पादकाने" कुत्र्यास लाज 
काका ला "भिजवला" भारी, दादा ला दिली तुरी ,
आणि गेला सोनिया च्या दारी ..
त्याने चाटायला सुरवात केली .. त्याने चाटायला सुरुवात केली 
त्याला लाज आणि इज्जत न्हाई , त्याला लाज आणि इज्जत बी न्हाई

आली आली हो  भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..

बशिवला झंप्या ला खुर्ची वरी , कोंडून ठेविला मातोश्री वरी
महाभकासिंनी नी घेतला कारभार हातात, करून चिरी - मिरी
घर कोंबडा हा ऐटीत, कोमट पाणी पीत बसून एसीत
भेंड्या आणि लुडो खेळीत,आराम करी सत्ता भोगीत
मामु खाई तुपाशी , शेणिक मरे उपाशी
शेतकऱ्यास  पाठविले , यम सदनासी

फेसबुक लाइव वर गप्पा भारी, बडबड करून थापा मारी ..
महाराष्ट्र राज्या ची परवाच न्हाई, देशाची बी परवाच न्हाई  

आली आली हो  भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..

काका चालविती सरकार, दादा ला दिला अर्थ व्यवहार
करून भोंगळ कारभार, संकट आणिले महाराष्ट्रावर
घोटाळया वर करी घोटाळे , करोना मात्र वाढे रोज शेकड्यांनवर
"खाद्य - मंत्री" भरती पैशांच्या नोटा, पेटया आणि पेट्या भर !
मुंबई हि आर्थिक राजधानी ,पछाडली कोरोनाग्रस्तां नी
सत्ताकारण करीत, वाट लाविली "महाभकास" वाल्यांनी ...
त्यांना जनते ची चिंताच न्हाई, खिसे भरून मलाई खाई  ..

आली आली हो  भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..

शेणिक झाले व्यथित, पण आता नाही त्यांना कोणी माय बाप
येण्शिपी - खान्ग्रेसी त्याना  हिणविती, घालिती  बुक्क्या आणि लाथ 
इज्जत गेली , सत्ता तर गेलीच गेली,
गद्दार शेण  -आ - पती पायी आयुष्य  "उध्वस्त" झाली
अहो ..सच्च्या  शेणीकां ची आयुष्य उध्वस्त झाली कि हो ...
त्यांना "बापा" ची आठवण आली , त्यांना "बापा" ची आठवण आली     

आली आली हो  भागा बाई ... आली आली हो भागा बाई 
तिच्या नवरया चा पत्याच न्हाई , तिच्या नवऱ्या चा पत्याच न्हाई ..