Saturday, November 8, 2025

Pulotsav - पुलदैवता चा पुलोत्सव


 पुलदैवता चा पुलोत्सव तर मराठी मनात जवळ जवळ रोजच अनुभवतो .. पण आजचा दिवस विशेष आहे.  

 ८ नोव्हेंबर - पुलदैवत जयंती !

दररोज पुलं चं  एक तरी वाक्य कुठल्या न कुठल्या प्रसंगा वरून आठवतं .. व्यक्ती आणि वल्ली तर अजून हि भेटतात! त्यांचा आवाज "हरितात्या", "राव साहेबां" सारखाच ऐकू येतो..सतत मराठी मना मध्ये घुमत रहातो!

मी मराठी साहित्या कडे मनापासुन वळलो ते बहुतेक पुलं च्या कथाकथना च्या कॅसेटस्  मुळे ..आपल्याला जे आसपास दिसतंय ते हा माणूस बरोब्बर शब्दात मांडतोय हे अगदी सामान्य वाचका च्या लक्षात येतं ..त्यामुळे एक प्रकारचा संवाद लवकर साधला जातो ..त्याच्या प्रतिकात्मक,रुपात्मक, तुलनात्मक  शैलीत लिहिण्याची लकब हि जवळीक निर्माण करणारी होती 

त्यांना "मध्यम वर्गीयांचा " लेखक असं म्हणायचे तेच बरोबर. मध्यमवर्गीय आवडी-निवडीं ची नस त्यांनी त्यांच्या लेखनात पकडलेली दिसते .. म्हणूनच ६०-७०-८० च्या दशकात तेव्हाचा  पुणे-मुंबई तील मध्यम वर्गीय हा त्यांचा "core" वाचक वर्ग होता. आज सुद्धा पुलं च्या साहित्य-कथा कथनाचा स्पर्श झाला कि मराठी तरुण, परत मराठी साहित्य -पुस्तकं वाचण्या कडे आकर्षित होत आहेत !

पुलं च्या जयंती निमित्त आज काही  निवडक आणि मनात विशेष घर करून बसलेली व्यक्ति चित्र आणि उतारे :

निवडक अंतू बरवा

रत्नागिरीच्या त्या मधल्या आळी मध्ये लोकोत्तर पुरुष राहतात. देवानी माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्या मध्ये रत्नागिरीच्या लाल चिर्याचे ,नारळा फणसाचे ,खाजर्या आळवाचे आणि फट म्हणता प्राण कंठाशी आणणार्या ओल्या  सुपारीचे गुण अगदी एकवटून भरलेत . 

अंतू बरवा हा ह्याच मातीत उगवला आणि पिकला.

जीवनाच्या कुठल्या तत्व ज्ञानाच्या अर्क हि मंडळी प्यायली आहेत .. देव  जाणे .. त्यातली निम्म्या हून अधिक माणसं मनी ओर्डर वर जगतात .. आणि त्यातले पैसे  वाचवून दावे लावतात..प्रत्येकाची तारीख पडलेली ..

विशाल सागर तीर आहे .. नारळीची बन आहेत  पोफळी च्या बागा आहेत ... सार काही आहे .... पण ...त्या  उदात्ततेला दारिद्र्य असं छेद देवून जांत आणि मग उरत काय ?   एक भयाण  विनोदाच  अभेद्य असं कवच !

कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील --- खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात !

-------------------------------------------------------------------------------------------------

निवडक रावसाहेब

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्लेन्ग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये .. ह्याला काही उत्तर नाही. पंधरा- पंधरा वीस- वीस वर्षाच्या परिचयाची माणसं असतात .. पण शिष्टाचाराची घडी थोडीशी  मोडण्या    पलीकडे  त्यांचा आणि आपला कधी संबंधच जात नाही .. त्यांच्या घरी जाणं होतं , भेटणं बोलणं होतं , पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत.

आणि काही माणसं ... आगदी क्षणभरात जन्म जन्मांतरीच नातं  असल्या सारखा दुवाद साधून जातात... वागण्यातला बेत शुद्ध पणा अगदी क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही , पूर्व संस्कार , भाषा , चवी, आवडी निवडी .. कशाचाही आधार लागत नाही ... सुत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात !

बेळगावच्या कृष्णराव  हरिहरांची अशीच गाठ पडली .. त्यांना सर्व लोक रावसाहेब म्हणायचे ... 

हि रावसाहेबी त्याना सरकार नी बहाल केली नव्हती .. जन्माला येतानाच ते  ती घेवून आले होते .. शेवट पर्यंत ती सुटली नाही !     

काही माणसांची वागण्याची तर्हाच अशी असते कि त्यांच्या हाती मद्याचा पेला देखील फुलतो आणि काही माणसं दुध देखील ताडी प्यायल्या सारखे पितात ..

रावसाहेब शौकीन होते पण वखवखलेले नव्हते ..जीवानात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले .... पण उपाशी वाघ हा  काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्या च्या वळणावर न्हेईल ?

------------------------------------------------------------------------------------------

निवडक हरितात्या

हरितात्या आम्हाला शिवाजी, तानाजी , समर्थ ,तुकाराम वैगरे मंडळींना हे असे भेटवून आणायचे ...

वर्गातला इतिहास मला कधी आवडला नाही आणि कळला हि नाही ...त्यात सन होती .. हरीतात्यांचा  इतिहास सणांच्या गणितात गुंतला नव्हता .. तो हरीतात्यान   इतकाच जिवंत होता...

हरीतात्यांनी इतिहास हा भूतकाल वाचक क्रीयापादानी दूर न्हेलेला नव्हता .. असं वाटायच कि नुकतेच भेटून आलेत छत्रपतींना.. आज लक्ष्यात येतं ... त्यांचा त्या गोष्टीतला मी म्हणजेच ती इतिहास नावाची अज्ञात व्यक्ती !

प्रत्येक  प्रसंगी हरितात्या त्या तिथे कसे हजर  होते हा विचार लहानपणी आमच्या डोक्यात कधी  शिरला नाही आणि मोठे पणी आम्ही त्यांना त्या जागृत समाधी तून कधी बाहेर काढलं नाही

माझं बालपण इतिहास जमा झालं ... घरातली करती माणसं हि दृष्ट लागून जावी तशी गेली ....आजोबा आज्जी गेली ... वडील गेले .. घरचे नात्या गोत्यातले लोकही आता परके झाले आहेत ... हरीतात्या कुठे गेले कोण चौकशी करतोय ..

पण कधी कधी पाठीलाही डोळे फुटतात आणि त्यात काचांच्या फुटक्या  तुकड्यात जशी खूप  प्रतिबिंब लक्षात यावीत  तशी जिव्हाळ्या ची दिवंगत   माणसे दिसायला लागतात .. जीव एवढा एवढासा होतो ...

एखादा उदबत्तीचा वास   एखाद्या नव्या कोर्या छत्री वर पाडलेल पाणी ... ..मनाला मागे घेऊन जातं .. हरीतात्यांचा आवाज घुमायला लागतो ..

या देवा घराच्या माणसांनी आम्हाला खूप दिलं .. सदैव इतिहासाचे पंख लावलेला हा वेडा बागडा माणूस आम्हा एवढ्या एवढ्या हलक्या पोरांना  घेवून उडत उडत  जायचा ... खर खोट  देव जाणे पण क्षत्रिय कुलावतौंस वैगरे च दर्शन  घडवायचा

आमच्या चिमुकल्या जीवनाच्या हरळी च्या मुळ्या त्यांनी भूतकाळात जाऊन रुजवल्या... हरीतात्यांनी  कधी आम्हाला पैशाचा खाऊ दिला नाही ... पण प्रचंड अभिमान दिला ..

चिमुकल्या मनगटात कसल्या तरी जोमाच्या मनगट्या घातल्या .. त्या वेळी दिसल्या नाहीत त्याच्या त्या अदृष्य वळ्या  पण आज  एखाद्या आघाताच्या क्षणी दिसतात . दुर्दैवानी दरवेळी  मुठी वळाव्यात तश्या वळतातच असे नाही ... पण वेळी प्रसंगी  वाळू शकतील असा कुठेतरी आत्मविश्वास जो आत मध्ये  लपलेला आहे तो हरीतात्यांनी आम्हाला  न मागता दिला... 

------------------------------------------------------------------

आज, हरितात्यांसारखेच पुल ही नाहीत .. पण ह्या  पुलदैवता चा पुलोत्सव मनात सदैव हरितात्यांच्या इतिहासा सारखाच जीवंत आहे !

२०११ साली "पुलकित" होऊन लिहिलेला छोटासा ब्लॉग -  "अंतु बर्व्याचे स्वगत"

=====================

आता पूर्वी सारखे पुणे उरलं नाही ...

पुण्या चा जाज्वल्य अभिमान असणारे ही आता चारलोकात बिचकून वागतात ... हमारे वक्त पूने में ऐसा नहीं था ..वैगरे वाक्य आपल्या मित्रात टाकुन बघतात ... पण त्या पुढे काही मजाल जात नाही

त्याला कारण ही तसेच आहे... ठेवलय काय आता इथे ... मुंग्यां सारखे लोक बे एरिया मधे गेले... तिकडे सदाशिव , नारायण , शनिवार पेठा वसव्ल्या.. बरोबरंच आहे .. पुढची पीढ़ी तरी सुखात नांदेल ... लोणी साखरेची चव पीनट बटर मधे शोधावी लागतेय एवढच दुख्ख

म्हणतात की आय टी नी पुण्याची प्रगति झाली .... कसली डोम्ब्ल्याची प्रगति ? नुसती गर्दी वाढली ... ती ही बाहेरची... पुण्यात आता मराठी बोलणारा हुड्कावा लागतो ... आपला असा एक म्हणाल तर शपथ ... परकेच जास्त ..

आय टी ने फ़क्त एकच केले ... पुण्याला पौडाच्या जवळ न्हेले !!!!

- अंतु बर्व्याचे स्वगत ( ८ नोव्ह २०११ )




Thursday, October 2, 2025

So Kul and So Kul take 2 ! सो कुल

 


In my exploration and reading Marathi women authors, I selected Sonali Kulkarni. I knew her as a sensitive and mature actress trained under Satyadev Dubey. Her books So Kul and So Kul take 2, are collections of her weekly articles/essays/diary pages, published earlier in Marathi Daily with some additional chapters that she has written for the book. 

I read these two books one after the other in piece-meal, reading 3-5 short essays in a week at leisure. SoKu's sensitivity is reflected in the books including her extreme left leaning along with fairly orthodox upbringing and cultural makeup. 

In evaluating the two books candidly, I found that the second book ( So Kul take 2) is written maturely. In reading the two books one after the other, one can easily spot transformation of a sensitive, dreamy and innocent girl into a sensitive , dreamy and mature women. Some of her writings are extremely touching. My biggest takeaways from her writings were some of the words in Marathi that I learnt, some forgotten words and phrases and some words or phrases that I had heard but had never read! I would recommend readers read both the books in order to understand the author (So Ku) better. So Kul take 2 is more readable than So Kul, So Kul needs to be perused at fast speed before starting So Kul take 2.

My biggest takeaway from So Ku's books were: 

I decided to read books of Dr Madhuri Vaidya, who in turn inspired me to read other authors like  Chin Tryam Khanolkar alias Aarti Prabhu , and Grace. These books definitely exposed me to the richness of Marathi literature ( that was limited to PuLa, VaPu etc in my earlier years). 

My liking for Marathi literature has brought me close to Moropant ( who I think is one of the greatest Marathi writers/poets born in last 500 year). More about him later as I explore his writings, Aarya and his life work. 

On a final thought, I realized that there can be left leaning, idealistic - socialistic people , who are not liberal , in fact quite orthodox culturally .. SoKu is a glaring example.